खात्यावर निर्धारित शिल्लक न ठेवल्यास संचालक मंडळ ठरवतील त्या दराने चार्जेस आकारले जातील.
बचत खात्यावर दरसाल दरशेकडा प्रमाणे संचालक मंडळ ठरवतील त्या दराने दैनंदिन उर्वरित रकमेवर व्याज काढण्यात येईल, सदर व्याज दरवर्षी सप्टेंबर अखेर व मार्च अखेर खात्यावर जमा करण्यात येईल.
बचत खाते बंद करताना खाते संयुक्त असले तर दोन्ही व्यक्तींच्या सह्या घेणे बंधनकारक आहे.
खातेदारने पासबुक हरवल्याबाबतचा अर्ज व संचालक मंडळाने ठरवलेले चार्जेस अदा केल्यास त्यास डुप्लिकेट पासबुक देण्यात येईल.
खातेदाराला चालू खात्यात कितीही रक्कम ठेवता येईल व कितीही वेळा रक्कम काढता येईल. या खात्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज अदा केले जात नाही.
चालू खाते उघडल्यानंतर खातेदारास चेकबुक देण्यात येईल. चालू खात्यावर निर्धारित शिल्लक रक्कम रुपये ₹२०००/- राहील. खात्यावर निर्धारित शिल्लक न ठेवल्यास मा. संचालक मंडळ ठरवतील त्या दराने चार्जेस आकारले जातील.
उपप्रकार:
दरमहा व्याज
तिमाही व्याज
सहामाही व्याज
अल्पमुदत ठेव
कायम ठेवची मुदत:
मुदतठेव साधारणतः ४५ दिवसांपासून जास्तीत जास्त १० वर्षांच्या कालावधीपर्यंत स्वीकारल्या जातील.
मुदत ठेवीकरीता किमान रक्कम ₹ १०००/- राहील.
बँकेतील अन्य मुदतीच्या ठेवीचे तसेच ठेवीदाराच्या सूचनेनुसार आपोआप नूतनीकरण केले जाईल (Auto Renewal).
वरील ठेवीवर तिमाही पद्धतीने चक्रवाढ व्याज दिले जात असल्यामुळे ठराविक मुदत संपल्यावर व्याजासह रक्कम परत दिली जाते.
सदर ठेवीची कमीत कमी रक्कम रुपये ₹१०००/- असेल. सदर ठेवींची मुदत कॅश सर्टिफिकेटसाठी १३ महिने ते १० वर्षे मुदतीकरता राहील तसेच दामदुप्पटसाठी व्याजाच्या दरावर मुदत अवलंबून राहील.
सदर सर्व ठेवीवरिल व्याज आयकर कायद्यातील १९४ ए/५ अनुसार टी.डी.एस. लागू राहील.
या योजनेंतर्गत गुंतवणुकीची किमान रक्कम रु. ₹१०००/- राहील. या प्रकारच्या खात्यातील ठेवीवर तिमाही तत्वावर चक्रवाढ व्याज देण्यात येईल.
तिमाही तत्वावर चक्रवाढ व्याज देण्यात येणारे रिकरिंग मुदतठेव खाते फक्त तीनच्या पटीतच महिन्यांच्या संख्येकरिता स्वीकारले जाईल व किमान कालावधी १२ महिने ते १० वर्षे असेल.
कुठल्याही कॅलेंडर महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी वा तत्पूर्वी भरणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास थकीत हप्त्यावर नियमानुसार दंड आकारण्यात येईल.
या ठेवीवरील व्याजावर १९४ ए/५ नुसार टी.डी.एस. लागू राहील.
सदर खाते बँकेच्या सभासद व बँकेचे सेवक यांनाच उघडता येईल.
पगारदार नोकरवर्गाची बँक असल्याने प्रत्येक सभासदाने काटकसर फंड ठेव रक्कम दरमहा पगारातून कापून द्यावे लागतील.
सभासदांच्या शिल्लक काटकसर फंड ठेव वर्गणी त्यांनी सभासदत्वाचा राजीनामा दिल्यास परत दिली जाईल, मात्र अशा रक्कम परत देतेवेळी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे त्यांचे स्वतःचे कर्जाबाबत अगर जमिनकी बोजाची तथा इतर कोणतेही येणे बाकी निघत असल्यास ते काटकसर फंड ठेव रक्कमेतून जमा/वसूल करून घेण्यात येईल.
एखादा सभासदाचे अत्यंत अडचणीच्या वेळी उदाहरणार्थ आजारपण तो कर्जदार नसल्यास अथवा कोणताही जामिनदार नसल्यास त्यास जमा शिल्लक रकमेच्या ७५% रक्कम परत करू शकतील.
ठेवीदारांना त्यांच्या ठेवीवर १५% दुरावा (मार्जिन) ठेवून म्हणजे ठेवीच्या ८५% रक्कम बँक कर्ज मंजूर करेल अशा कर्जावर ठेवीच्या व्याजदराच्या २% अधिक व्याज आकारण्यात येईल.
संयुक्त खात्यावर कर्ज घ्यावयाचे असेल तर त्यावर सर्व ठेवीदारांच्या सह्या आवश्यक आहेत.