कार्यालयीन वेळ

सोम-शुक्र:-१०:३० am - १:०० pm व २:०० pm - ५:३० pm
सुट्टी: प्रत्येक रविवारी, तसेच दुसऱ्या व चौथ्या शनिवारी
इतिहास

बँकेचे संस्थापक

कै. श्री. रामचंद्र यशवंत महाजनी
कै. श्री. रघुनाथ य. पवार
कै. श्री. भिकाजी म. भोपटकर
कै. श्री. वसंतराव रा. कोतवाल

अभिमानास्पद दैदिप्यमान प्रगतीशील वाटचाल

भारतामध्ये सहकारी कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सुमारे १० वर्षांनी सन १९१४ साली या बँकेची स्थापना झाली. सुरुवातीला फक्त पुणे नगरपालिकेचे सेवकच बँकेचे सभासद होते. 'दि पुना सिटी म्युनिसिपल को-ऑप - केडिट सोसायटी' या नावाने सन १९१४ मध्ये स्थापना झाली. या संस्थेचे अधिकृत भांडवल ५०००/- रूपये होते. दरमहा पगार होणारा म्युनिसिपालिटीच्या कोणीही सेवक संस्थेचा सभासद होत असे. कर्जाची कमाल मर्यादा २५०/- रूपये इतकी होती. कर्जासाठी एक जामिनदार चालत असे सन १९३५ मध्ये कर्जफेड ३६ महिन्यात केली जावी असा नियम मंजूर झाला. सन १९४५ मध्ये कर्ज मर्यादा ६०० /- रूपये झाली.

पुणे नगरपालिकेचे माजी चिफ ऑफिसर कृष्णाजी पुरूषोत्तम परांजपे यांचे प्रमुख सहाय्यक असि. चिफ ऑफिसर रामचंद्र यशवंत महाजनी यांनी ही संस्था स्थापण्यात पुढाकार घेतला व ११ ऑक्टोबर १९१३ रोजी संस्था रजिस्टर करण्याकरीता रितसर अर्ज रजिस्ट्रार को-ऑप सोसायटी यांचेकडे पाठविला व दिनांक १३.०२.१९१४ रोजी हि संस्था रजिस्टर झाली. संस्थेचे पहिले अध्यक्ष होते कृष्णाजी पुरूषोत्तम परांजपे तर संस्थापक रामचंद्र यशवंत महाजनी हे सेक्रेटरी होते. संस्थेची पत वाढावी यासाठी सुरुवातीच्या कार्यकर्त्यांनी नामांकीत व्यक्तींच्याकडून बँकेकरीता ठेवी गोळा केल्या. यामध्ये न.चिं. उर्फ तात्यासाहेब केळकर, तत्कालीन नगरपालिकेचे माजी अध्यक्ष श्री.ल.ज.आपटे अशा मान्यवरांचा समावेश होता. पहिली ठेव नगरपालिकेचे माजी सदस्य श्री.ल.र. कारळे यांची १०००/- रूपयांची मिळाली यातुनच पहिल्या वर्षी सभासदांना कर्ज वाटप करण्यात आले. या वर्षी संस्थेस २५ रूपये ४ आणे व ३ पैसे इतका नफा झाला याचा उल्लेख दिनांक २५.०३.१९१५ रोजी प्रसिध्द झालेल्या पहिल्या ताळेबंदात आहे. कर्जाची गरज भागविण्याकरीता सन १९२१ पासून सक्तीच्या काटकसर फंडाची योजना राबविली गेली व पुढे सन १९३४-३५ मध्ये संस्थेस अर्बन बँकेचा दर्जा प्राप्त झाला.

अतिशय महत्वाचे म्हणजे - कर्जवसूली परिपुर्ण व व्यवस्थित होण्यासाठी सन १९३५-३६ साली तत्कालीन कार्यकारी मंडळाने प्रयल करून सेवकांचे पगारातून बँकेचे हप्ते कपात केले जावेत असा ठराव नगरपालिकेच्या सभेत सन १९३५-३६ साली संमत करून घेतला. बँकेच्या आर्थिक स्थैर्याकरता व सर्वागीन वृध्दीकरीता ही बाब ऐतिहासीक ठरली.

सन १९२७-२८ साली त्यावेळेचे नगरपालिकेचे अध्यक्ष रा..कॉ. आर. के. नायडू यांनी संस्थेसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली व नंतर १९३९-४० साली बँकेने घर नं ७३, ... वाडा, बुधवार पेठ, पुणे येथे जागा भाड्याने घेतली. या इमारतीचा पायाभरणी समारंभ दि. २१-२-१९६४ रोजी भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री. ना. यशवंतरावजी चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्यानंतर १९७० साली आजची बँकेची सुशोभित स्वमालकिची वास्तु - ७६८, सदाशिव पेठ, पुणे येथे दिमाखात उभी राहिली.

सन १९२८-२९ साली एक मदतनीस कारकुन व अर्धा दिवस काम करणारा शिपाई असा पगारी सेवकवर्ग प्रथमच नेमला गेला. संस्थेस दिनांक १३.०२.१९३९ रोजी २५ वर्ष पूर्ण झाले - रौप्य महोत्सव त्यावेळेचे मुंबई स्थानिक स्वराज्य मंत्री कै.ना.ल.मा. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला याकरता तत्कालीन नगरपालीकेचे अध्यक्ष कै.ना.. शितोळे, उपाध्यक्ष भ.अ. शिरोळकर व स्थायी समितीचे अध्यक्ष आचार्य प्र. के. अत्रे यांनी सहकार्य केले हा महोत्सव विश्रामबागवाड्यातील नगरपालिकेच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळेपर्यंत बँकेची सभासद संख्या ९२१ इतकी होती - भागभांडवल १८६३०/- रूपये व ठेवी ९१२५०/- रूपये इतक्या होत्या. तर तर कर्जवाटप होते १३००००/- यावर्षी बँकेला २५७८/- रूपये इतका नफा झाला होता. अन १९५३ पासुन पुणे महानगरपालिका, शिक्षणमंडळ व वाहतुक खाते या सर्व खात्यातील सेवकांची संस्था म्हणुन आपली बँक कामकाज करू लागली .

शुन्य टक्के एन.पी.ए.व भक्कम आर्थिक स्थिती यामुळे बँकेला १९५० सालापासून सतत 'अ' दर्जा प्राप्त होत आहे. सभासदांचा, ठेवीदारांचा, खातेदारांचा बँकेवरचा विश्वास, मा. संचालक मंडळाचे प्रगतीशिल धोरण व कुशल व्यवस्थापन व कर्मचारी वर्गाची मेहनत यामुळे ही बँक शताब्दी पूर्ण करून वेगाने, नेञदिपक अशी प्रगती करीत आहे. मे. रिझर्व्ह बँकेने सुध्दा बँकेच्या या प्रगतीची प्रचित दखल घेतली आहे.

बँकिंग बरोबरच बँकेने 'सामाजिक बांधीलकीही' अविरत जोपासली आहे. सभासद व सेवकांच्या इयत्ता १० वी व १२ वी चे परीक्षेत विशेष गुण संपादन करणाऱ्या पाल्यांचे यथोचित कौतूक सोहळ्याचे आयोजन करून प्रतिवर्षी नियमितपणे त्यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते केला जातो.

पुणे महानगरपालिका भवन व स्वारगेट येथील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मालकीच्या वास्तुमुळे बँकेच्या सभासदांच्या सोयीकरीता "विस्तारीत कक्ष" सुरू केले आहेत. महाराष्ट्रातील पगारदार नोकरांचा नागरी सहकारी बँकेचा मुकुटमणी अशी बँकेची यथायोग्य ओळख आहे.

घटक
विवरण
बँकेचे संस्थापक
कै. रामचंद्र यशवंत महाजनी
बँकेचे पहिले अध्यक्ष
कै. मा.कृष्णाजी पुरुषोत्तम परांजपे
पहिली जागा
1927-28 नगरपालिकेचे अध्यक्ष कै.डॉ.आर.के.नायडू यांनी नगरपालिकेत उपलब्ध करून दिली. कालांतराने 1930-31 ला विश्रामबाग वाड्यात स्थलांतरित
पहिली भरती
1928-29 (३ लोक पगारी)
पगारातून हफ्ते कपातीचा ठराव
नगरपालिकेच्या जनरल सभेत सन 1935-36 सालात ठराव
संस्थेस अर्बन बँकेचा दर्जा प्राप्त
सन 1934-35
रौप्य महोत्सव
१३ फेब्रुवारी 1939; सभासद: 921; भाग भांडवल: 18630 ठेवी : 91250; कर्ज :130000. रौप्य महोत्सवासाठी खर्च ₹.250, सेवक संख्या 5, नगरपालिकेचे 1950 मध्ये महानगरपालिकेत रुपांतर झाले. यानंतर काही वर्षांनी वाहतुक खाते सुरू झाले.
काटकसर फंड
उद्देश्य: सभासदांना काटकसरची सवय लावून सभासदास आर्थिक उन्नती साधण्यासाठी सहाय्य करणे. सन 1921 च्या मुख्य सभेने सभासदांकडून सक्तीची ठेव दरमहा वसूल करण्याचा खर्च परित केला व 1936 मध्ये लेखापरीक्षांनी सदर योजनेचे कौतुक केले. 1947-48 नंतर सभासद स्वइच्छेने काटकसर फंडातील रक्कम वाढवून देऊ लागले (दरमह ₹.3)
बँकेचे रेशन दुकान
27.05.1943 सुरू झाले, नंतर काही काळाने बंद करण्यात आले.
संस्थेची पहिली सभा
11.10.1913
संस्थेची नोंदणी
13.02.1914 रजिस्टर 14 लोकांच्या सह्यांचा अर्ज
पहिली ठेव
नगरपालिकेचे माजी सभासद कै.ल.र.करळे यांची ₹.1000 ची 7% दराने ठेव